काँग्रेसला मोठा धक्का..मुस्लिम समाजातील जाणी-माणी हस्तींचे शिवसेनेत प्रवेश..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता नव-नवीन ब्रेकिंग बातमी वाचायला मिळत आहे; अशीच एक नवीन ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. मुस्लिम समाजातील जाणी-माणी हस्तींचे शिंदे शिवसेना मध्ये प्रवेश केला आहे.
आज बुधवारी 29 ऑक्टोबर रोजी बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे राज्य उपाध्यक्ष मोईन काजी यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.मोईन काजी गेल्या 37 वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते,यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोईन काजी यांनी काँग्रेसकडून मुस्लिम समाजाच्या कोट्यातून बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते,मात्र अचानक त्यांनी शिंदे शिवसेना मध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसचा मोठा धक्का मानल्या जात आहे.
मोईन काजी यांच्यासह पत्रकार इसरार देशमुख,सैलानी ट्रस्ट माजी सचिव अ. हमीद,सांडू बागवान,इलियास मिर्झा,समीर सर पठाण,दानिश सर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.मुस्लिम समाजातील जाणी-माणी हस्तींनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकित शिवसेनेला फायदा होईल की,या प्रवेशाचा कोणताच परिणाम मुस्लिम समाजावर पडणार नाही हा येणारा निवडणुकीचा काळात समजेल.एवढे मात्र खरे..



