सोनाळा पोलिसांची मोठी कारवाई: ५ देशी पिस्तुल, १६ काडतूस सह आरोपींना अटक..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा:बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत ५ देशी बनावटीच्या पिस्तुलांसह दोन अतिरिक्त मॅग्झीन, १६ जिवंत काडतुसे, एक कार, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील दोन तरुणांना अटक करण्यात आली असून एक शस्त्र पुरवठादार आरोपी फरार आहे.
मोहम्मद नफिज अकिल अली वय २४ मोहम्मद उबेद रझा मोहम्मद अल्फाज वय २१ दोघेही रा. चांदामेठा, ता. परासिया, जि. छिंदवाडा (मध्य प्रदेश) अशे आरोपीची नावे आहेत. तसेच पिस्तुल पुरवणारा एक अनोळखी इसम सध्या फरार आहे.




