बेजबाबदारपणा: रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट लाईट नसलेल्या फाउंडेशनला कार धडकली..कारचा मोठा नुकसान..
फाउंडेशनला कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने झाला अपघात, होता-होता वाचला मोठा अपघात..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा शहरातील सोसायटी पेट्रोल पंपाजवळील सर्क्युलर रोड बायपास रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट लाईट नसलेल्या फाउंडेशनला कार धडकल्याने अपघात झाल्याची घटना आज रात्री 7:30 वाजेच्या सुमारास घडली.या धडकेमुळे कारमध्ये बसलेल्यांना मोठा झटका बसला आहे.यामुळे कारमधील बसलेले घाबरले होते.या अपघातात कारचा मोठा नुकसान झाला आहे.वाहनची गती कमी असल्याने हा मोठा अपघात होता-होता वाचला.विशेष म्हणजे दसऱ्याच्या पासून अनेक वाहनांचा फाउंडेशनला धडकून अनेक अपघात घडले आहे.रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट नसलेल्या फाउंडेशनला कोणताही दिशा दर्शक फलक न लावल्याने हे फाउंडेशन वाहन धारकांना दिसत नसल्याने वाहन थेट फाउंडेशनला धडकताय. यामुळे संबंधित प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.या बेजबाबदारपणा लोकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे.
सोसायटी पेट्रोल पंपाजवळील सर्क्युलर रोड बायपास रस्त्याच्या मधोमध मोठा स्ट्रीट लावण्यात आला होता.दरम्यान दसेऱ्या पासून या रस्त्याच्या मधोमध असलेला स्ट्रीट काढण्यात आला आहे.व त्याचे फाउंडेशन जसेचे तसे ठेवण्यात आले आहे.या फाउंडेशनला कोणतेही दिशा दर्शक देखील लावण्यात आले नाही.शिवाय या परिसरात अंधार असल्याने नवीन वाहनधारकांना हे फाउंडेशन दिसत नसल्याने भरधाव वाहनाला याची धडक बडतेय यामुळे अपघात घडतंय आज बुधवारी 22 ऑक्टोबर रोजी रात्री मूळ बुलढाणा येथील रहवासी असलेले सध्या पुण्याला स्थायीक असलेले सिव्हिल इंजिनिअर राजेश देशमुख यांची कार याच फाउंडेशनला धडकली,कारमध्ये त्याचे परिवारातील सदस्य बसलेले होते,त्यांना हे फाउंडेशन न दिसल्याने हा अपघात घडला आहे.ते खांमगाव हुन बुलढाणा परतले होते.दरम्यान राजेश देशमुख यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.




