शासकीय इमारतीवर आगळी-वेगळी विद्युत रोषणाईचा झगमगाट ; पुतळ्यांच्या शहरात पुतळे मात्र उनाड !

भर दिवाळीत पुतळ्यांवर आगळी-वेगळी विद्युत रोषणाई नसल्याने शहरवासीयांमध्ये नाराजीचा सूर..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा : संपूर्ण देशभरात आज दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. बुलढाणा शहरात देखील दिवाळीचा झगमगाट पाहायला मिळतोय, सर्वच शासकीय इमारतींवर आगळी-वेगळी विद्युत रोशनाईची रंगीत चादर पांघरण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे पुतळ्याचे शहर म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा शहरात दिमाखात उभे असलेल्या या पुतळ्यांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही.. एकाही पुतळ्यावर आगळी-वेगळी विद्युत रोषणाई केली नसल्याने “शासकीय इमारतींवर झगमगाट मात्र थोर पुरुषांचे पुतळे पडले उनाड” असा नाराजीचा सूर बुलढाणा शहरवासियांमध्ये पाहायला मिळतोय..

हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक दिवाळी हा सण आहे. देशभरात दिवाळी साजरी केली जाते,भगवान राम, रावणाचा वध केल्यानंतर, १४ वर्षांच्या वनवासानंतर, त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. अयोध्येच्या लोकांनी रामांचं स्वागतासाठी दिव्यांनी संपूर्ण शहर सजवले होते, ज्यामुळे दिवाळीचा उत्सव सुरू झाला.हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी या परंपरेचे पालन करून, लोक अजूनही त्यांची घरे दिव्यांनी आणि रोषणाईने सजवतात,

गेल्या 18 ऑक्टोबरच्या धनतेरस पासून दिवाळी सुरू झाली आहे.दिवाळी निमित्त संपूर्ण बुलढाणा शहर रोषणाईने सजला आहे,घरांवर,सरकारी कार्यालयांवर अथवा शहरातील स्ट्रीट लाईटवर आगळी-वेगळी रोषणाई करण्यात आली आहे.रोषणाईचा दिवाळी सण असतांनाही मात्र बुलढाणा शहरातील महापुरुषांचे स्मारके उन्हाड पडलेले आहे.कोणत्याही स्मारकांवर कोणतीही आगळी-वेगळी विद्युत रोषणाई करण्यात आली नाही.शिवाय भारतात बुलढाण्यातील दुसऱ्या क्रमांकांचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकही दुर्लक्षित असल्याचे पहावयास मिळाले आहे. महाराजांच्या स्मारकावरही आगळी-वेगळी विद्युत रोषणाई करण्यात आली नाही.यामुळे अनेकांच्या मनातून नाराजीचा सुरू असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.कोणावर टिका करण्यासाठी लोकप्रिय मराठी ही बातमी प्रसारीत करीत नाही,उलट झालेली चूक आणि जनतेमध्ये होत असलेली नाराजी लक्षात आणून देण्याचे लोकप्रिय मराठीचा प्रयत्न आहे.

कर्तव्यदक्ष आमदार संजय गायकवाड यांनी पुढाकार घेत बुलढाणा शहरात 18 च्या वर महापुरुषांचे सौंदर्यकरणाच्या माध्यमातून पुतळे व स्मारक उभारले या स्मारकांवर नेहमीसाठी विद्युत रोषणाई देखील लावण्यात आली आहे.मात्र दिवाळी निमित्त बुलढाणा शहरात गेल्या 18 ऑक्टोबर पासून सुरू झालेली दिवाळी निमित्त घरांवर,सरकारी कार्यालयांवर अथवा शहरातील स्ट्रीट लाईटवर आगळी-वेगळी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.मात्र आज मंगळवारी 21 ऑक्टोबरच्या लक्ष्मी पूजनाच्या म्हणजे मुख्य दिवाळीच्या दिवशी आगळ्या-वेगळ्या विद्युत रोषणाई बुलढाण्यातील स्मारकांवर न केल्याने हे स्मारके उन्हाड पडलेले आहे..

-शिवरायांच्या काळात व्हायची दिवाळी साजरी-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दिवाळीचा सण राजमहल, गड-किल्ले आणि जनतेच्या घरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात होता. या सणात धार्मिकता, कर्तव्य आणि राष्ट्रप्रेम दिसून येत होता. शिवराय स्वतः अत्यंत धार्मिक व संस्कारशील होते. त्यामुळे दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा, भाऊबीज आणि फटाक्यांचा उत्सव साजरा करण्यात येत होतं.दिवाळीच्या आधी धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी गडावर आणि राजवाड्यात विशेष सजावट केली जाई. दिव्यांच्या रांगा, सुगंधी धूप, पुष्पमाळा आणि हळद-कुंकूने सजलेले दरबार हे दिवाळीचे वैशिष्ट्य होते. महाराज स्वतः सर्वांना शुभेच्छा देत आणि सैनिकांनाही बक्षिसं वाटायचे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!