बुलढाणा नगर परिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर; 30 नगरसेवकांपैकी 15 महिला राहणार नगरसेवक..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा नगर परिषदेच्या 15 प्रभागातील 30 नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत आज बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील,मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या नेतृत्वात बुलढाणा नगर परिषदेच्या हॉल मध्ये करण्यात आली आहे. या आरक्षण सोडत मध्ये 30 नगरसेवकांपैकी 15 नगरसेवक हे महिला असणार आहे.जाहीर करण्यात आलेल्या सोडतची माहिती उद्या 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्धी करण्यात येणार आहे.9 ते 14 ऑक्टोबर पर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.
या प्रभाग निहाय आरक्षण सोडत करिता अनेक पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
-अश्या पद्धतीने झाले प्रभाग निहाय आरक्षण जाहीर-
प्रभाग-1-(अ) अ.जा. (ब) सर्व साधारण महिला
2-(अ) ना.मा. प्र. (ब) सर्वसाधारण महिला
3-(अ) ना.मा. प्र.महिला (ब) सर्वसाधारण
4) (अ) ना.मा. प्र. (ब) सर्वसाधारण
5) (अ) अ. जा.महिला (ब) सर्वसाधारण
6) (अ) अ. जा.महिला (ब) सर्वसाधारण
7) (अ) अ. ज महिला (ब) सर्वसाधारण
8) (अ) ना.मा. प्र.महिला (ब) सर्वसाधारण
9) (अ) अ. जा. (ब) सर्वसाधारण
10) (अ) सर्वसाधारण महिला (ब) सर्वसाधारण
11) (अ) ना.मा. प्र. (ब) सर्वसाधारण महिला
12) (अ) ना.मा.प्र. (ब) सर्वसाधारण महिला
13) (अ) अ. जा.महिला (ब) सर्वसाधारण
14) (अ) ना.मा. प्र.महिला (ब) सर्वसाधारण
15) (अ) ना.मा. प्र महिला (ब) सर्वसाधारण




