आरक्षणा संरक्षणासाठी बुलढाण्यात आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आज सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी आदिवासी समाजाकडून बुलढाण्यात विराट मोर्चा काढण्यात आला होता.स्थानिक जिजामाता प्रेक्षगार मैदानापासून जयस्तंभ चौक,बाजार लाईन,कारंजा चौक होत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला.यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन महामहिम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले.एसटी आरक्षणात कोणाचीही गुसखोरी होऊ देणार नाही हे सरकारने स्पष्ट करावे अन्यथा हिवाळी हिवेशनमध्ये घुसू असा इशारा यावेळी देण्यात आला.
जरांगे पाटील यांच्या आंदोलन नंतर हैद्राबाद गॅजेट लागू करून मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण देण्यात आलं,त्याच धर्तीवर धनगर आणि बंजारा समाजाने देखील हैद्राबाद गॅजेट व अन्य पुरावे समोर करून धनगर आणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी मोर्चे काढण्यात आले.याच विरोध करून एसटी प्रवागात कोणत्याही समाजाची गुसखोरी होऊ देणार नाही.याकरिता आज बुलढाण्यात विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यामध्ये जिल्ह्याभरातून हजारो आदिवासी आपल्या वेशभूषेत सामील झाले होते..




