बांवनबीरात दोन समाजात दंगल,देवी विसर्जन रॅलीत दगडफेक,5 ते 7 जखमी…

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या गावात दोन समाजात राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. गावात निघालेल्या देवी विसर्जन रॅलीत आज 4 ऑक्टोबरच्या रात्री 8 ते 8:30 वाजेच्या दरम्यान दोन्ही समाजाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत 5 ते 7 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी नाव घेतली असून गावात मोठा फौज-फाटा पोलिसांचा लावण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रमिक लोढा व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील,दोन्ही ठाणेदार व पोलीस अधिकारी हे गावात दाखल झाले आहे. देवी विसर्जन मिरवणुकीमध्ये वादग्रस्त गाना वाजविल्यामुळे ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे..सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.




