डोमरूळ गावकऱ्यांनी सीएम फंडात जमा केली मदत, सर्वांनी मदत करण्याचे केले आवाहन

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर व सर्व सामान्यांना फटका बसला आहे.अनेकांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना व पीडित नागरिकांना मदतीचे हात पुढे करीत आहे.दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची ही वेळ आहे या भावनेतून डोमरूळ येथील गावकऱ्यांनी सामाजिक जाणीवतेचे भान ठेवून आपल्या शेतकरी बांधवांसाठी १० हजार १०० चा निधी जमा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत डीडी द्वारे जमा केले आहे.हा निधी बुलढाणा जिल्हाधिकारी मार्फत पाठविण्यात आले आहे.डोमरूळ गावकऱ्यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधीलकीची सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी सर्वांनी आप-आपल्या परीने समाजातील प्रत्येक घटकाने मदत करण्याचे आवाहन ही डोमरूळ गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.




