“सील” टाक्यातून रात्री चोरट्या मार्गाने बायो-डिझेलची विक्री, आत्तापर्यंत कोट्यवधी रूपयांच्या महसूल व जीएसटीचा भष्ट्राचार..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा : मलकापूर–खामगाव राष्ट्रीय महामार्गावर नायगाव जवळील अवैध बायो-डिझेल पंपाच्या टाकीत 2023 मे एक आणि आत्ता 2 तरुणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात लोकप्रिय मराठी ने खांमगाव ते नांदुरा व मलकापूर पर्यंत 18 पेक्षा जास्त अवैध बायो-डीजल पंप सुरू असल्याचे समोर आणले होते.दरम्यान मलकापूर व नांदुरा हद्दीतील जवळपास 16 अवैध बायो-डीजल पंपाच्या व त्यांच्या टाक्यांना महसूल प्रशासनाने सील ठोकले आहे.मात्र हे बायो-डीजल माफिया सध्या ही प्रशासनाच्या कारवाईला जुमानत नसल्याचे समोर आले आहे.चोरट्या पद्धतीने “सील” असलेल्या टाक्यात पाईप टाकून मोटारीच्या साहाय्याने रात्री बायो-डिझेल चोरून विकणे सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून लोकप्रिय मराठीच्या हाती लागली आहे.”यामध्ये स्थानिक प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय उपस्थित होतो आहे.” म्हणून आत्ता जिल्हा महसूल व जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सील करण्यात आलेल्या पंप व टाक्यांना उध्वस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ते खामगाव राष्ट्रीय महामार्गावर तब्बल १८ पेक्षाबअवैध बायोडिझेल पंप उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार लोकप्रिय मराठीने उघडकीस आणला होता. याबाबत लोकप्रिय मराठीने मुद्दा उपस्थित केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी हे अवैध पंप उध्वस्त करण्याचे आदेश दिले होते.आदेश मिळताच जिल्हा पोलीस दलाने 2 अवैध बायो-डीजल पंपावर छापा टाकत ते सील केले होते,दरम्यान कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी सर्व पंपाना मुळासह उध्वस्त करण्याचे आदेश दिल्यातर मलकापूर आणि नांदुरा हद्दीतील जवळपास 16 पंपाना व त्यांच्या टाक्यांना सील ठोकले आहे.
-खांमगाव हद्दीतील 2 अवैध बायो-डिजल पंपावर का नाही कारवाई-
प्रशासनाने मलकापूर आणि नांदुरा हद्दीतील 16 पंपांवर कारवाई करून ते सील केले आहे,मात्र खांमगाव तहसील हद्दीतील 2 अवैध बायो-डिझेल पंप खुलेआम सुरू आहे.या दोघांना अद्यापर्यंत कारवाई का केली गेली नाही.हा देखील एक संशोधनाचा विषय आहे.या दोघांना कोणाचे वरदहस्त आहे का.असा प्रश्न विचारले जात आहे.
-अवैध बायो-डीजल पंपामुळे होतोय कोट्यवधी रुपयांचा महसूल व घीएसटीचा भष्ट्राचार –
सध्या मलकापूर-खांमगाव राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले 18 पेक्षा जास्त अवैध पंपातुन वाहन धारकांना बायो-डीजल विकले जात आहे.वास्तविक पाहता भारतामध्ये बायो-डीजल नावाचा कोणताही इंधन अस्तित्वात नाही.ज्याची वाहनधारकांना विक्री होत आहे.ते इंडस्ट्रियल ऑईल आहे.ते ज्वलनशील पदार्थ आहे. हा ज्वलनशील पदार्थ बायो-डीजलच्या नावाने परराज्यातून आलेले माफिया खुलेआम शासनाच्या डोळ्यांसमोर मलकापूर-खांमगाव राष्ट्रीय महामार्गावर बिनधास्तपणे मोठे-मोठ्या टाक्या जमिनीत गाडून आणि पंप लावून कोणतीही परवानगी न घेता हे ज्वलनशील पदार्थ म्हणजे इंडस्ट्रियल ऑईल विकता आहे.विशेष म्हणजे एका पंपावर दररोजचा लाखों रुपयांचा म्हणजे राजरोज कोटयावधी रुपयांचा उलाढाल सुरू आहे.यामुळे महसूल व जीएसटीचा देखील भ्रष्टाचार होते और याला प्रशासन उघळ्या डोळ्याने पाहत आहेत.




