जिल्हा परिषदच्या टॉवर चढून दोन ग्रामस्थांचे शोले आंदोलन..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील भोसा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशीसाठी बुलढाणा जिल्हा परिषदच्या टॉवरवर चढुन दोन ग्रामस्थांनी शोले आंदोलन सुरू केले आहेत. संजय करवते, सचिन जाधव असे आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांचे नावे आहेत.आमच्या मागण्या पूर्ण करा असे नारे देत हे जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत खाली उतरणार नाही. असा पवित्रा दोघांनी घेतला आहे.घटनास्थळी पोलिस व जिल्हा परिषदेचे अधिकारी पोहचले आहे,जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात व ठाणेदार रवी राठोड यांनी आंदोलन कर्त्याना खाली उतरण्याचे आवाहन देखील करण्यात केले आहे.दोघांजवल पेट्रोल ने भरलेली बॉटल देखील आहे.




