बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोघांचा मृत्यू, एक गंभीर
मलकापूर-नांदुरा मार्गावरील नायगाव फाट्या जवळील बायोडिझेल पंपा ठिकाणची घटना

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: मलकापूर-नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नायगांव फाट्याजवळील अवैध बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज २६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे.साजीद खान जलील खान व मुस्ताक खान जब्बार खान अशी मृतकांची नावे आहेत.तर आरिफखान बशिरखान हा गंभीर जखमी झाला आहे, दोघा मृतकांचे मृतदेह व गंभीर जखमी युवकाला पोलिसांनी र्यतीच्या प्रयत्नाने बायोडिझेल पंपाच्या टाक्यातुन बाहेत काढण्यात आले आहे. गंभीर जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तिघेही मलकापूर येथील पारपेठ प्रभागातील रहिवासी आहेत. बायो डीझल पंपावर अपघात घडल्याची माहिती मृतकांच्या नातेवाईकांना देण्यात आली.तर अपघात कसा घडला याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत.विशेष म्हणजे याच बायो डिझेल पंपाच्या टाक्यात काही वर्षां अगोदर असच एका युवकाचा मृतदेह सापडला होता.त्याचा मृत्यू कसा झाला होता हे पोलिसांकडून अद्याप समोर आलेले नाहीये.




