बुलढाण्यात बंजारा समाजाचा विराट मोर्चा, हजारोंची उपस्थिती…
एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: राज्यातील बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने आज गुरुवारी २५ सप्टेंबर रोजी बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते. विशेष या मोर्च्यात बंजारा समाजाच्या वेशभूत महिलाच नाही तर पुरुष ही सहभागी झाले होते.मोर्च्या दरम्यान बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशातील बंजारा समाजाला एसटी संवर्गात आरक्षण असून आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील बंजारा समाजातील रितीरिवाज, बोलीभाषा एकच आहे. मात्र राज्यात बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण देण्यात आलेले नाही. शासनाने आता हैदराबाद गॅझेटीयर लागू करण्याचा आदेश काढला असून त्यानुसार बंजारा समाजाला एसटी संवर्गात आरक्षण देणे अपेक्षीत आहे. मात्र शासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही.त्यामुळे राज्यात बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्हयातील सकल बंजारा समाजाच्या वतीने येथील जिजामाता क्रीडा संकुल मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. येथील जिजामाता क्रीडा संकुल मैदानावरून काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो बंजारा बांधव सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आ लेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.




