चित्रा वाघ यांचा सरकारला घरचा आहेर.. म्हणे महिला सुरक्षेसाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणीची गरज !
मयुरीच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची चित्रा वाघ यांची मागणी

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील हुंडाबळी ठरलेल्या मयुरी बुडुकलेच्या कुटुंबीयांची आज २४ सप्टेंबर रोजी भाजप आमदार चित्रा वाघ यांनी भेट दिली. दरम्यान बुडुकले कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले.
आधी वैष्णवी हगवणे त्यानंतर चार हुंडबळीची प्रकरणे आणि आता मयुरीच्या मृत्यू नंतर राज्यात कायद्याचा धाक उरला नसल्याचं मी अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांनी व्यक्त करत राज्यात महिलांसाठी असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त करून त्यांनी एका प्रकारे गृह खात्यालाच आव्हान देत घरचा आहेर दिला आहे.त्यामुळे महिलांसाठी राज्यात असलेले कायदे चांगले आहेत. मात्र पोलिस खात्याकडून त्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानेच हुंडाबळी सारखे भयावह प्रकार वाढत असल्याचं त्या म्हणाल्या.




