स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आम्ही शिवसेना-भाजप महायुतीला प्राधान्य देणार- आ.संजय गायकवाड

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: ओबीसी आरक्षणा संदर्भात न्यायालयाच्या निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होवू घातले आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी महायुती करून निवडणुका लढविल्या आहेत.मात्र येणाऱ्या स्थानिक निवडणुकामध्ये पुन्हा एक सोबत महायुती होवून निवडणूक लढणार की नाही याची शास्वती नसल्याचे बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड यांच्या विधानाच्या व्हिडीओने समोर आले आहे.
बुलढाण्याच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आ.गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्ष्याच्या महायुतीला प्राधान्य देणार,आम्हाला भाजप-शिवसेना महायुती पाहिजे.असे म्हटले आहे.त्यांच्या या विधानामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असो की,बुलढाणा नगर पालिका निवडणुक असो यामध्ये महायुतीची युती होते की,नाही याची चिंता कार्यकर्त्यांसाठी आ.गायकवाड यांना सतवतेय असल्याचा प्रत्यय त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्यातुन त्यांच्या विधानाने समोर आला आहे.
आ.संजय गायकवाड यांनी आपल्या भाषणात हे उल्लेख करून सांगितले की, लोकसभा, विधानसभेला आपण महायुती युती करतो, मात्र कार्यकर्त्याच्या निवडणुकीत आपण त्यांना वाऱ्यावर सोडतो.त्याने पैसे खर्च करून मातीत जायचं का..? आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका ही सोप्या राहिल्या नाहीत. अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. बुलढाण्यामध्ये शनिवारी 20 सप्टेंबर रोजी ओंकार लॉन येथे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता,या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित होते.




