ईकबाल चौकातील आय लव मोहम्मदच्या फलकाने वेधले सर्वांचे लक्ष

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: आय लव मोहम्मद फलकाचा प्रकरण पाहता-पाहता उत्तर प्रदेश मधून संपूर्ण भारतात पसरतांना दिसत आहे.बुलढाण्यातील मुस्लिम बहुल असलेल्या ईकबाल चौकात देखील आय लव मोहम्मद चे मोठे फलक लावण्यात आले आहे.हे फलक सर्वांचे लक्ष वेधत आहे.
उत्तर प्रदेश मधील कानपुरच्या रावतपुर येथे आय लव मोहम्मद फलक लावल्याने पोलिसांनी रावतपुर येथील 25 युवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची बातमी व्हायरल झाल्याने आम्ही आमचे प्रेरणास्थान असलेले प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावर प्रेम करू शकत नाही का? असा प्रश्न उपस्थित करून या कारवाईमुळे मुस्लिम समाजात संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी आपल्या सोशल आकाउंड वरून आय लव मोहम्मदचे स्टेट्स लावून या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे.विविध प्रकारे या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान उत्तर प्रदेशच्या कानपुरचे पोलीस उपायुक्त दिनेश त्रिपाठी यांनी व्हिडीओ द्वारे खुलासा केला आहे,की नेहमीच्या ठिकाणी टेंट न लावता दुसऱ्या ठिकाणी टेंट लावल्याने उत्तर प्रदेशच्या कानपुरचे पोलीसांकडून सदर युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.अफवांवर गिश्वास ठेवू नये.
बुलढाण्याच्या ईकबाल चौकात देखील आय लव मोहम्मद चे मोठे फलक लावण्यात आले असून त्यामुळे हे फलक सर्वांचे लक्ष वेधत आहे.




