शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या वाहनाने युवकाला उडवले , चिखलीतील घटना..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
चिखली : शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या वाहनाने एका युवकाला उडविले. ही धक्कादायक घटना आज गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी चिखली शहरात घडली.अपघातात युवक गंभीर जखमी झाला आहे.
अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक (रा. वाशीम) यांच्या इनोव्हा गाडीने पायी जाणाऱ्या कृष्णा नंदू लष्कर (वय 25, रा. गौरक्षण वाडी चिखली) या तरुणास पानगोळे हॉस्पिटलसमोर उडवले. सकाळी दहाच्या वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. आमदार सरनाईक हे बुलढाण्यातील माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेटीसाठी जात होते. घटनेनंतर आमदार सरनाईक यांनी स्वतः जखमी युवकास गाडीत टाकून जवंजाळ हॉस्पिटल येथे दाखल केले, मात्र घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.या भीषण अपघातात कृष्णा गंभीर जखमी होऊन सध्या कोमात असून त्याला तातडीने जवंजाळ हॉस्पिटल, बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चिखली पोलिसांत पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.




