स्पेशल 26 सारखाच सांगलीत डॉक्टराच्या घरी छापा,कोट्यवधींच्या सोन्या-चांदीचे दागिने व रोख लूटले

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
सांगली- आपण स्पेशल 26 आयकर विभागावर आधारित चित्रपट पाहिला असेल या चित्रपटात हे आयकर अधिकारी अस्सल नव्हे तर बनावट असतात.आणि आयकर विभागाच्या नावाचा धाक दाखवून लुटतात.असाच धक्कादायक प्रकार सांगलीमध्येही घडला आहे. येथे बनावट आयकर अधिकारी बनून आलेल्या चार जणांच्या टोळक्याने तपासणी वॉरंट दाखवून एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या घरातील कोट्यवधींच्या सोन्या-चांदीचे दागिने व रोख लुटले आहे.हा प्रकार अनेकांच्या डोळ्यासमोर घडला आहे. मात्र आयकर अधिकारी असल्याचे समजताच कुणीही काही करू शकले नाही.घडलेल्या प्रकारानंतर समोर आले की,ते स्पेशल 26 चित्रपटा सारखा बनावट छापा होता,वारंट देखील बनावट होते..
सांगलीत डॉ. म्हेत्रे यांचं गुरुकृपा नावाचं हॉस्पिटल असून, ते हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर राहतात. डॉ. म्हेत्रे आणि त्यांची पत्नी घरी होते. दरम्यान, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात पुरुष आणि एक महिला रुग्णालयात आले. आपण डॉक्टरांचे नातेवाईक असून, एका रुग्णासोबत आलो असंल्याचे कंपाउंडरला सांगितले.त्यानंतर कंपाउंडर याने डॉ. म्हेत्रे यांना बोलवण्यासाठी घराच्या दिशेने जात असताना त्यावेळी या चौघांनी कंपाऊडरचा पाठलाग करत डॉक्टरांच्या घरात घुसले. व आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले व डॉ. म्हेत्रे यांना आपली ओळख आणि वॉरंटचं पत्र दाखवलं.व घरात शोधा-शोध करून घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटली. तसेच घरात मोडतोड केली.सदर छापा आयकर विभागाचा नसल्याचे समजल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आल्याने पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत माहिती जाणून घेतली.पुढील तपास पोलीस करीत आहे.




