बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, खामगाव सह इतर तालुक्यात जोरदार पाऊस
विजांचा कडकडाटासह पहाटेपासून पडतोय मुसळधार पाऊस

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव,चिखली बुलढाणा, देऊळगाव राजा सह इतर तालुक्यात पहाटेपासून विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस पडतोय. जोरदार पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.मागील महिन्यात सुद्धा असाच जोरदार पाऊस झाला होता, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन उडीद मूग कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सध्या सोयाबीन काढणीला आली आहे, आणि अशातच काल सुद्धा काही भागात पाऊस झाला असून रात्रीपासून चिखली बुलढाणा देऊळगाव राजा आणि आज पहाटे पासून खामगाव शेगाव तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.




