आरोपींना ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही, जिल्हा न्यायालयाने गुन्ह्यातील ॲट्रॉसिटी ॲक्टची गुन्हे केली खारीज
जिल्हा न्यायालयाचा पहिल्यांदाच असा निवाळा

बुलढाणा (प्रतिनिधी) : धाड पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही.म्हणून गुन्ह्यातील ॲट्रॉसिटी ॲक्टची गुन्हे खरीच करून गुन्ह्यातील आरोपींची जामीन मंजूर केल्याचा पहिल्यांदाच असा निवाळा बुलढाणा जिल्हा न्यायालयाने दिला आहे.
धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे. जनुना येथील रामेश्वर दादाराव सरदार यांनी १२ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली की, अमोल शिवाजी पवार, दीपक शिवाजी पवार, संजय राजाराम पवार, चरण संजय पवार या चौघांनी फिर्यादीस डोक्यात दगड मारून जातीवाचक शिवीगाळ करून “तुमची अजून जिरली नाही, तुमच्यापैकी एकाला मारून टाकतो, असे म्हणत मारहाण केली’. यावेळी गावातील जमलेल्या लोकांनी भांडण सोडवले या अगोदर त्यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल झालेला असून या प्रकरणात फिर्यादी साक्षीदार असल्याने त्यांनी फिर्यादीस मारहाण करून माझा मोबाईल देखील काढून घेऊन फोडून टाकला अश्या आशयाची फिर्याद रामेश्वर सरदार यांनी धाड, पोलिस स्टेशन येथे दिल्यानंतर याप्रकरणी अमोल पवार, दीपक पवार, संजय पवार व चरण पवार यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा व भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
– न्यायालयाने हा युक्तिवाद वाद ग्राह्य धरला –
दरम्यान ॲट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्याखाली आरोपी दीपक पवार व संजय पवार यांना पोलीस स्टेशन येथील तपास अधिकारी यांनी १२ सप्टेंबर रोजी अटक करून विद्यमान न्यायालया समक्ष हजर केले असता आरोपींतर्फे वकिलांनी विद्यमान न्यायालयात सरकारी पक्षाच्या युक्तिवादाला प्रखर विरोध करून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की,आरोपी एसटी प्रवर्गात असून तेच ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू असलेल्या प्रवर्गातुन येतात.या प्रकरणात पोलिसांनी घाई गबळीत आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्टचे गुन्हे नोंदवलेले आहे.आरोपींना ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही.असा युक्तिवाद केला. या प्रकरणी न्यायालयाचे कामकाज रात्री १० पर्यत चालले. सदर प्रकरणामध्ये दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही.व गुन्ह्यातील ॲट्रॉसिटी ॲक्टचे गुन्हे एकाच दिवसात खरीच केल्याचा व गुन्ह्यातील आरोपींची जामीन मंजूर केल्याचा पहिल्यांदाच असा निवाळा बुलढाणा जिल्हा न्यायालयाने दिला आहे.आरोपींकडून अँड. अजय दिनोदे यांच्या मार्गदर्शनाखाली अँड. रोहित दिनोदे, अँड. अबुजर अंसारी, अँड. प्रियेश चौधरी, अँड. किशोर सुरुशे यांनी न्यायालयात कामकाज पाहिले.




