माजी मंत्री धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र..

मुंबई- माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून लातूर जिल्ह्यातील भरत महादेव कराड यांनी केलेल्या आत्महत्या बाबत मोठी मागणी केली आहे. मुंडे यांनी केलेल्या मांगणीवर फडणवीस काय भूमिका घेणार आहे, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर ओबीसीमधील इतर जातींचे आरक्षण संपुष्टात येईल असा दावा केला जात आहे. याच भीतीने लातूर जिल्ह्यातील भरत महादेव कराड यांनी आत्महत्या केली आहे. आता करडा यांच्या आत्महत्येचा मुद्दा पुढे करत आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.माजी मंत्री धनंजय मुडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेला पत्र चर्चेचा विषय बनला आहे.
-धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे ही केली मागणी-
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर ओबीसीमधील इतर जातींचे आरक्षण संपुष्टात येईल या धाकाने लातूर जिल्ह्यातील भरत कराड यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित राहावे यासाठी बलिदान दिले असून त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सरकारने स्व. भरत महादेव कराड (रा. वांगदरी, ता. रेणापूर, जि. लातूर) यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत पात्रतेनुसार नोकरी मिळवून द्यावी,अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे व उपमुख्यमंत्री तसेच अजित पवार, एकनाथ शिंदे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे..




