“सेवा पंधरवाडा” निमित्त भाजपाची जिल्हा कार्यशाळा संपन्न
सरकारच्या योजना लाभार्थ्यां पर्यंत पोहचवा- सह पालकमंत्री ना.संजय सावकारे

बुलढाणा- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी जन्मदिवस तसेच 2 ऑक्टोंबर रोजी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने “सेवा पंधरवडा अभियान” राबविले जाणार आहे.
या सेवा पंधरवडा अभियानाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गर्दे हॉल येथे जिल्ह्याची कार्यशाळा संपन्न झाली तसेच या जिल्हा कार्यशाळे दरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी व इतर विविध नियुक्त्यांची घोषणा केली आहे.
सेवा पंधरवाडा अभियाना निमित्त जिल्हाभरात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर,मोदी सरकारच्या कार्याचा प्रचार प्रसार, नागरिक संवाद, दिव्यांग सन्मान, क्रीडा स्पर्धा ईत्यादी समाजोपयोगी लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या जिल्हा कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक भाजपाचे सह पालकमंत्री ना. संजयजी सावकारे , प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुखजी संचेती, प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, आ.श्वेताताई महाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे , माजी आमदार तोतारामजी कायंदे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ गणेशची मांटे ई मान्यवरांची उपस्थिती होती.
शासनाच्या विविध योजनांची माहिती देत ना. संजय सावकारे यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. “सरकारचे विविध लोकोपयोगी निर्णय व योजना ह्या जनते पर्यंत पोहचवून त्याचा लाभ मिळवून द्या, जनतेचा आशीर्वाद आपल्या आपल्या सोबत असल्याने येणारा काळ हा भाजपा पक्षासाठी सुवर्ण काळ असून कार्यकर्त्यांनी जनसेवेच्या संधीचे सोने करावे व भाजपचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन सह पालकमंत्री ना.संजय सावकारे यांनी केले.
यावेळी प्रदेश महामंत्री आ.रणधीर सावरकर यांनीही सेवा पंधरवाडा अभियानाची सविस्तर माहिती देत “सेवा पंधरवाडा हे फक्त एक अभियान नसून ही एक जण सेवेची संधी आहे, नागरिकांना पक्षाच्या व सरकारच्या कामाची माहिती पोहचविण्याचे काम या अभियानाद्वारे करावे अश्या सूचना त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.
या शिवाय व्यासपीठावरील प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती, आ.श्वेताताई महाले पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे या मान्यवरांचीही यथोचित भाषणे झाली. या जिल्हा कार्यशाळेचे सूत्रसंचालन जिल्हा महामंत्री दत्ता पाटील यांनी केले तर कार्यशाळेचे नियोजनासाठी अभियानाचे जिल्हा संयोजक श्री चंद्रकांत बरदे, सह संयोजक गजानन घुगे, सह संयोजक विजय पवार, शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.या शिवाय कार्यशाळेस जिल्हा भरातून भाजपचे जिल्हा पदाधिकारी, विविध आघाडी मोर्चाचे प्रमुख, मंडळ अध्यक्ष , अभियानाचे संयोजक,सह संयोजक ई असंख्य पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




