बुलढाण्यात तोतया सीएच्या घरी नागपूर आयकर विभागाचा छापा.
कर्मचाऱ्यांचे बोगस क्लेम करून 300 कोटी रुपयां पेक्षा जास्त रुपयांचा आयकर विभागाला लावला चुना

बुलढाणा शहरातून एक बिग ब्रेकिंग समोर आली आहे.नागपूर येथील आयकर विभागातील अधिकाऱ्यांच्या एका पथकाने 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बुलढाणा शहरातील एका तोतया CA च्या घरी छापा मारून कॉम्प्युटर मधून डेटा जप्त केले आहे.या तोतया सीएचा विष्णू मुळे असे नांव आहे.
विष्णू मुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे फॉर्म नंबर 16 चे आयकर रिटर्न भरून त्यात बोगस क्लेम दाखल करत होता.क्लेम भरल्यानंतर कर्मचाऱ्याला आयकर विभागाकडुन मिळालेल्या क्लेम मधून 30 टक्के कमिशन घेत होता.तोतया सीए विष्णू मुळे यांनी 1600 वर फॉर्म 16 भरून व बोगस क्लेम करून 300 कोटी रुपयां पेक्षा जास्त रुवयांचा चुना आयकर विभागाला लावल्याची खात्रीलायक वृत्त हाती लागले आहे..या कमिशन मधून या तोतया सीए विष्णू मुळे यांनी करोडोंची प्रॉपर्टी जमवली आहे.
असे असतानांही छापा टाकणाऱ्या नागपूर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तोतया सीए विष्णू मुळे ला अटक केली नाही हे विशेष..म्हणून आयकर विभागाच्या अधिकारी आणि तोतया सीए विष्णू मुळे मध्ये कोट्यवधी रुपयांची तडजोड झाल्याची चर्चा रंगत आहे..
विशेष म्हणजे ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी बोगस क्लेम करून घेत आयकर विभागाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे.ते देखील दोषी आहेत.या गंभीर प्रकरणात चौकशी होणे गरजेचे आहे..




