बुलढाण्यात ७ मार्चपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच छताखाली

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: ​जिल्ह्यातील नागरिकांना महसुली सेवा जलद आणि कार्यक्षमरीत्या मिळाव्यात, यासाठी महसूल प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यामध्ये ७ मार्चपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सहा टप्प्यांत राबवले जाणार असून, नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
​जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पाटील यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी या शिबिराची संकल्पना राबवण्यात येत आहे.


या शिबिरात महसूल विभागाशी संबंधित विविध कामांचे निवारण एकाच ठिकाणी केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने:
महसूल सेवा: वारसा नोंदी, फेरफार मंजुरी, डिजिटल सातबारा व आठ-अ चे वाटप, अभिलेख दुरुस्ती.
सुधारणा व योजना: तुकडेबंदी कायदा, अकृषक परवाने, पोट हिस्सा मोजणी, मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना, ई-मोजणी अर्जांचे स्वीकार.
इतर सुविधा: संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड दुरुस्ती आणि दिव्यांगांसाठी युडीआयडी (UDID) कार्डचे वितरण.

​सहा टप्प्यांत शिबिराचे आयोजन:

जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील विविध महसूल मंडळांत हे शिबिर पार पडणार आहे. शिबिराचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल: ​पहिले टप्पे: ७ मार्च आणि १४ मार्च,दुसरे टप्पे: १० एप्रिल आणि १७ एप्रिल,तिसरे टप्पे: ८ मे आणि १५ मे
​गतवर्षी या शिबिराचा १ लाख २२ हजार नागरिकांनी लाभ घेतला होता, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड आणि महसूल विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!