खामगावच्या शेलोडी रोडवरील अवैध वेश्या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त; आयपीएस आदित्यकुमार सिंग यांच्या पथकाची धडक कारवाई

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

खामगाव: तालुक्यातील खांमगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेलोडी रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर आयपीएस आदित्यकुमार सिंग यांच्या पथकाने गुरुवारी (दि. २८ फेब्रुवारी) धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन महिला आणि चार पुरुष ताब्यात घेण्यात आल्याचे माहिती मिळाली असून आरोपींवर पिटा ऍक्ट नुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांच्या या कृतीचे स्वागत केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेलोडी रोडवरील एका ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू होत्या. या ठिकाणी कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती मिळल्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे (आयपीएस) यांच्या आदेशाने प्रशिक्षणावर असलेले आयपीएस आदित्यकुमार सिंग यांच्या पथकाने शेलोडी रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा मारून कारवाई केलो. शेलोडी रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे परिसरातील शांतता भंग पावत होती आणि ग्रामस्थ अत्यंत त्रस्त झाले होते. वारंवार तक्रारी करूनही हा व्यवसाय सुरूच असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने झालेल्या कारवाईचे ग्रामस्थ स्वागत करत आहेत.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!