इच्छाशक्तीपुढे कडक उन्हाचाही विसर; बुलढाण्याच्या ५ वर्षीय अबियाचा पहिला ‘रोजा’!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: एकीकडे उन्हाचा वाढता पारा आणि दुसरीकडे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत अन्न-पाण्याविना राहण्याची कठीण परीक्षा… पण या कठीण परीक्षेत बुलढाण्याच्या एका ५ वर्षीय चिमुकलीने आपल्या दृढ निश्चयाने यश मिळवले आहे. मिर्झा नगर येथील सालेहा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अबिया सोहिल खान या चिमुकलीने आपल्या आयुष्यातील पहिला पवित्र रमजानचा उपवास (रोजा) पूर्ण केला असून, तिच्या या कौतुकास्पद निर्णयाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.

​​पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांमध्ये अल्लाहची इबादत करण्यासाठी महिनाभर उपवास ठेवले जातात. आज रमजानचा ९ वा उपवास होता. अबियाने पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांच्या ‘सहेरी’ला उठून अन्नाचा त्याग केला. दिवसभर खेळता-बागडतांनाही तिने आपल्या उपवासाचा नियम मोडला नाही. अखेर संध्याकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी ‘इफ्तार’ करून दुआ पठण करत तिने आपला पहिला रोजा सोडला.

​इतक्या लहान वयात म्हणजे केवळ पाच वर्षांच्या कोवळ्या वयात, कडक नियमांचे पालन करत रोजा ठेवणे ही मोठी बाब मानली जाते. नऊ तासांहून अधिक काळ काहीही न खाता-पिता राहून अबियाने दाखवलेली ही ध्येयशक्ती सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरली आहे.अबियाची ही हिम्मत पाहून तिच्या कुटुंबीयांसह सालेहा अपार्टमेंटमधील रहिवाशांनी व खान परिवाराच्या मित्र मंडळ व नातेवाईकांनी तिचे जंगी कौतुक केले.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!