बुलढाणा जिल्हा कोषागार कार्यालयातील अप्पर कोषागार अधिकाऱ्यासह दोन लिपिक ऐसीबीच्या जाळ्यात ,१५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाणा येथील जिल्हा कोषागार कार्यालयात आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली. अप्पर कोषागार अधिकारी मुंढे यांच्यासह लिपिक काळे आणि घट्टे अशा तिघांना १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा कोषागार कार्यालयात कामासाठी येणाऱ्या तक्रारदाराकडून आरोपींनी कामाच्या बदल्यात २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून पीडिताने अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, आज कार्यालयात सापळा रचण्यात आला.

एसीबीचा यशस्वी सापळा

​एसीबीचे प्रमुख अधिकारी श्री. चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दुपारी कार्यालयात दबा धरला. २० हजार रुपयांपैकी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे ठरले होते. लाचेची ही रक्कम स्वीकारतानाच अप्पर कोषागार अधिकारी मुंढे, लिपिक काळे आणि लिपिक घट्टे या तिघांना पथकाने रंगेहात बेड्या ठोकल्या.

एसीबीचे आवाहन

​”शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणे हा गुन्हा आहे. अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी थेट एसीबीशी संपर्क साधावा,” असे आवाहन एसीबीचे प्रमुख अधिकारी श्री. चोरमले यांनी केले  आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!