महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रशासनाचा निषेध; डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेसाठी गजानन ससाणे यांचे आमरण उपोषण!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: ज्या संविधानाने देशाला दिशा दिली, ज्या संविधानामुळे लोकशाहीची मंदिरे उभी राहिली, त्याच संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नगराध्यक्ष यांच्या शिर्षस्थानी असलेली प्रतिमा खुद्द नगर परिषद कार्यालयातून हटवण्याचे धाडस प्रशासनाने केले आहे. या संतापजनक प्रकाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते गजानन ससाणे यांनी ३ जानेवारीपासून बुलढाणा नगर परिषद प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला असून, त्यांनी बुलढाणा नगर परिषदेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार समोरच ‘आमरण उपोषण’ सुरू केले आहे.

​​याबाबत असे आहे की, २५ डिसेंबर २०१६ रोजी माजी नगराध्यक्षा नजमुन्नीसा बेगम यांनी पदभार स्वीकारताना संविधाप्रती निष्ठा म्हणून आपल्या दालनात आपल्या शिर्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आकर्षक प्रतिमा लावली होती. मात्र, मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी ती प्रतिमा हटवण्याचे ‘पातक’ केले होते. त्यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर प्रशासनाला झुकावे लागले आणि प्रतिमा पुन्हा लावली गेली होती.​दुर्दैवाने, नऊ वर्षांनंतर पुन्हा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. ५ जानेवारी रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या पदभारानंतर, आसनाच्या शीर्षस्थानी असलेली बाबासाहेबांची प्रतिमा गायब करून त्या जागी राजकीय नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. “प्रशासनाला लोकशाहीपेक्षा राजकीय नेत्यांची मर्जी राखणे मोठे वाटते का?” असा तिखट सवाल आता सामाजिक कार्यकर्ता गजानन ससाणे यांनी विचारले आहेत. ​गजानन ससाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचे हत्यार उपसले आहे.​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सन्मानपूर्वक “जैसे थे” स्थितीत तात्काळ बसवावी.
​प्रतिमेला कायमस्वरूपी संरक्षण देऊन भविष्यात नवीन इमारतीतही ती सन्मानाने राहील, याची लेखी हमी द्यावी.
​अशा अश्लाघ्य प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी.अश्या मागण्या त्यांनी केल्या आहेत.​”जोपर्यंत बाबासाहेबांची प्रतिमा सन्मानाने पुन्हा लागत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही,” असा आक्रमक पवित्रा गजानन ससाणे यांनी घेतला आहे. आता जिल्हा प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!