शिवसेनेच्या बुलढाणा उपशहर प्रमुखपदी ‘विजय कोल्हे’

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा शहरातील शिवसेना संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले असून, शहराच्या राजकारणात सक्रिय असलेले विजय भीमराव कोल्हे (रा. इंदिरा नगर) यांची बुलढाणा उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कोल्हे यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पक्षवाढीसाठी नव्या दमाने काम करणार
विजय कोल्हे यांची नियुक्ती जाहीर होताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेनेची ध्येयधोरणे शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा संकल्प कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी ते सक्रियपणे कार्य करतील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल इंदिरा नगर परिसरासह संपूर्ण बुलढाणा शहरातून कोल्हे यांचे अभिनंदन केले जात आहे




