प्रजासत्ताक दिनीच, न्याय मागण्यासाठी युवक चढला बुलढाण्यातील ३०० फूट उंच टॉवरवर!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: “प्रजासत्ताक दिनीच एक अत्यंत खळबळजनक घटना बुलढाण्यातुन समोर आली आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध न्याय मिळत नसल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललंय. न्याय मिळवण्यासाठी एक युवक तब्बल बुलढाण्याच्या ३०० फूट उंच बीएसएनएलच्या टॉवरवर चढला आहे.”
“बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मांडवा गावातील वैभव खरे असे या युवकाचे नाव असून, त्याने चक्क ३०० फूट उंच टॉवरवर चढून प्रशासनाचा निषेध केला आहे.
मोहणा ग्रामपंचायतीमध्ये झालेला गंभीर भ्रष्टाचार, सरकारी कागदपत्रांमध्ये झालेली खाडाखोड, बोगस घरकुल प्रकरणे आणि सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे यांविरोधात वैभव खरे याने वारंवार निवेदने दिली होती. मात्र, दोषींवर कोणतीही कारवाई न झाल्याने, प्रजासत्ताक दिनीच या युवकाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.”
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, युवकाला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या युवकाने घेतला आहे. आता या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”




