चंद्रपुरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! चालत्या ट्रेनमध्ये चढताना वृद्धाचा पाय घसरला, प्रवाशांच्या सतर्कतेने वाचले प्राण.

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: चंद्रपूर रेल्वे स्थानकावर ‘नवजीवन एक्सप्रेस’ दाखल झाली होती. प्रवासी गाडी पकडण्यासाठी धावपळ करत होते. तेवढ्यात गाडीला हिरवा कंदील मिळाला आणि ट्रेनने वेग पकडायला सुरुवात केली. अशातच एका वृद्धाने चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं.
चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या वृद्ध प्रवाशाचा पाय अचानक घसरला आणि ते प्लॅटफॉर्मवर फरफटत गेले. कोणत्याही क्षणी रेल्वे रुळांच्या आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत पडणार होते, तितक्यात प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या प्रवाशांचे लक्ष गेले.
वेळ न दवडता, तिथे असलेल्या प्रवाशांनी देवदूतासारखी धाव घेत त्या वृद्धाला ओढून मागे घेतले. प्रवाशांच्या या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आणि वृद्धाचे प्राण वाचले. ही सर्व थरारक घटना रेल्वे स्थानकावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.




