नाती रक्ताळली! किरकोळ वादातून काकाने केली पुतण्याची कुऱ्हाडीने हत्या…

चिखली तालुक्यातील हातनी येथील संतापजनक घटना; आरोपी काकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील ​चिखली तालुक्यात घरफोडी, हाणामारी आणि बलात्कारासारख्या घटनांनी गुन्हेगारीचा आलेख उंचावत असतानाच, चिखली तालुक्यातील हातनी येथे काका-पुतण्याच्या पवित्र नात्याला गालबोट लावणारी एक थरारक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून काकाने आपल्या २४ वर्षीय पुतण्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

हातनी येथील रहिवासी गोपाल अजबराव जाधव (वय २४) हा काल रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या घरी होता. यावेळी त्याचा सख्खा काका विनोद रामचंद्र जाधव याच्याशी काही किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक असलेला हा वाद पाहता-पाहता विकोपाला गेला. रागाच्या भरात असलेल्या विनोद जाधवचा स्वतःवरील ताबा सुटला आणि त्याने जवळच असलेल्या कुऱ्हाडीच्या मागच्या भागाने पुतण्या गोपालच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.

-​जागीच झाला मृत्यू-

हा वार इतका भीषण होता की, वर्मी घाव लागल्याने गोपाल प्रचंड वेदनेने विव्हळत जमिनीवर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गोपालचा जागीच मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी घडलेल्या या भीषण हत्याकांडाने परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

-​पोलिसांची तत्पर कारवाई-

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तातडीने सूत्रे हालवली. ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी काका विनोद जाधव याला अवघ्या काही वेळातच ताब्यात घेऊन अटक केली.
​सध्या या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत. कुटुंबातील व्यक्तीनेच अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने हातनी गावावर शोककळा पसरली आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!