भाजपचे अमोल अंधारे हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत दाखल,मंत्री आकाश फुंडकर यांनी शब्द पाळला नाही, अमोल अंधारेंचा आरोप..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या खामगावमध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि बजरंग दलाचे माजी जिल्हा संयोजक ॲड.अमोल अंधारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत, हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय. ​ त्यांच्या पक्ष प्रवेशाने बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागात शिवसेना पक्षाला मोठे बळ मिळाले असून भारतीय जनता पार्टीला मोठा झटका मानल्या जात आहे.

ॲड.अमोल अंधारेंनी तीन दशकांहून अधिक काळ संघ परिवारातील विविध संघटनांमध्ये निष्ठेने कार्य केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या संघटनांमध्ये शाखा संयोजक ते विदर्भ प्रांतसहमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. ॲड.अमोल अंधारे विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार म्हणून भाजपचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात अमोल अंधारे यांना काही शब्द दिले होते. मात्र, तो शब्द पाळला जात नसल्याचे लक्षात येताच अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नाराज होऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मागील आठवड्यात अकोला येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. या पक्ष प्रवेशावेळी ॲड. अमोल अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खामगाव तालुक्यातील घाटाखालच्या संपूर्ण परिसरातील सुमारे पाच हजाराच्या वर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश करून घेणार असल्याचे शब्द दिले होते. त्यानुसार काल शनिवारी खामगावातील श्री हरी लॉन येथे भव्य प्रवेश सोहळा पार पडला.यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अंधारे यांचे पक्षात स्वागत करून, त्यांच्या अनुभवाचा शिवसेनेला बुलढाणा जिल्ह्यात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अमोल अंधारे यांचा शिवसेना प्रवेश भाजपसाठी मोठी हानी मानली जात आहे. विशेषतः हिंदुत्ववादी मतांवर पकड असलेल्या ॲडवोकेट अंधारे शिवसेनेत जाण्याने खामगावच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!