वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची अशीही कर्तव्यदक्षता, महिला म्हणाल्या “शूक्रिया”

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: पोलीसांचे कर्तव्यदक्षता नेहमीच चर्चेला जाते,कोरोना काळातही आपल्या जीवाची पर्वा न कर्ता पोलिसांनी आपली कर्तव्यदक्षता निभावली होती,ती देखील पोलिसांची कर्तव्यदक्षता चर्चेला गेली होती,अशींच बुलढाणा वाहतूक पोलीस शाखेतील कर्मचारी पोहेका सुनील किनगे व पोहेका श्रीकृष्ण कुवारे यांची कर्तव्यदक्षता चर्चेला जात आहे.काल रविवारी 28 डिसेंबर रोजी जयस्तंभ चौकात आठवडी बाजारात रात्री एका महिलेची हरवलेली पर्स त्या महिलेला परत केली.
काल रविवारी आठवडी बाजारात एका महिलेला पर्स सापडल्याने त्या महिलेने जयस्तंभ चौक येथे वाहतूक सुरळीत करीत असताना वाहतूक पोलीस शाखेतील कर्मचारी पोहेका सुनील किनगे व पोहेका श्रीकृष्ण कुवारे यांच्याकडे सुपूर्द केला.हा पर्स महिलेचा असल्याचे आपल्याकडे सांभाळून ठेवला.संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास तीन महिला पर्स शोधत असतांना दरम्यान दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलांना विचारपूर केल्यानंतर तिघांमधील एका महिलेचा पर्स हरवल्याची आणि आपल्याकडील पर्स याच महिलेचा असल्याची खात्री झाली यावरून आपल्या पर्स कसे आहे,त्यात किती पैसे आहे,अशी विचारपुस करून या महिलेला पोहेका सुनील किनगे व पोहेका श्रीकृष्ण कुवारे यांनी त्या महिलेला त्याचा हरविलेला पर्स व पर्समध्ये बाराशे रुपये परत केले.यावेळी त्या महिलांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा “शूक्रिया” या शब्दात आभार मानले.मात्र पोलीस कर्मचाऱ्यांची अशा कर्तव्यदक्षता मुळे पोलीस खात्यात प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षता असल्याने समाजात “खाकीची” इज्जत केली जाते एवढे मात्र नक्की..




