पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मेहकर नगराध्यक्षपदाची अनोखी भेट..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे मेहकर नगर पालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर भास्करराव गारोळे यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले ..
अत्यंत विपरीत परिस्थितीत मेहकर चे नगराध्यक्ष निवडून आल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी नगराध्यक्ष किशोर गारोळे व सहा नगरसेवक तसेच उपस्थित शिवसेना पदाधिकारी यांचे कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले. व भविष्यातिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
यावेळी संपर्कप्रमुख खासदार व माजी मंत्री अरविंद सावंत , आमदार हारूण खान , निलेश धुमाळ , मनोज कपोते , भास्करराव गारोळे, नगरसेवक विलास चनखोरे , प्रा. सतीश ताजने, महेश रिंढे, नितीन तुपे , निसार अन्सारी , या व्यतिरिक्त तालुका प्रमुख निंबाजी पांडव , युवा तालुखा प्रमुख ॲड आकाश घोडे , संदीप गारोळे , योगेश कंकाळ, डॅा. सार्थ खरात ,विजय चांगाडे , विलास शिंदे इत्यादी उपस्थित होते ..




