लोकप्रिय मराठी ईम्पक्ट: मिरवणुकीत उधळलेल्या गुलालाची साफ-सफाई सुरू…

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाणा नगर परिषदेचे 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला,या निकालात आमदार संजय गायकवाड यांच्या बाजुने शहर वासीयांनी कौल दिला. 22 शिवसेनेचे नगरसेवक तर नगराध्यक्ष पदी आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजाताई संजय गायकवाड ह्या विजयी झाल्या. विजय घोषित झाल्यानंतर विजयी मिरवणुक बुलढाणा शहरातील मुख्य-मुख्य मार्गाहून काढण्यात आली,यात मोठा जल्लोष करीत मोठ्या प्रमाणात गुलाल उधळण्यात आले. विजयी मिरवणुक होवून दोन दिवस उलटले,तरी आज मंगळवारी देखील शहरातील मुख्य चौकात रस्त्यावर गुलाल पडून असल्याचे व पडलेल्या गुलालाची बुलढाणा नगर परिषदेकडून साफ-सफाई करण्यात आली नसल्याने व याचा त्रास जनतेला सहन करावा लागत असल्याचे शिवाय अनेक नागरीकांच्या दुचाकीवर व अंगावर हवेच्या माध्यमातून गुलाल उडत असून, विजयी मिरवणुकीत गुलाल तर उधळला,मात्र रस्त्यावर पडलेला हा गुलाल कोण करणार साफ? असा प्रश्न उपस्थित करणारी वास्तविकता लोकप्रिय मराठीने समोर आणली होती,याची काही तासातच दखल घेत बुलढाणा नगर परिषदेकडून अग्निशामक वाहनाच्या मार्फत आज रात्री 11 वाजेपासून साफ-सफाई सुरू करण्यात आली आहे.जयस्तंभ चौक,कारंजा चौक यांच्यासह मुख्य मार्गावर विजयी मिरवणुकीत उधळलेल्या गुलालाची साफ-सफाई करण्यात आली आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!