बुलढाणा नगर परिषदेत बॅक डेट मध्ये विकास कामांचे बिले काढण्याचा प्रकार,काँग्रेसचा आरोप…

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा नगर परिषदेत आदर्श आचारसंहिता लागण्याचा आगोदर झालेले विकास कामांचे देयके बॅक डेट मध्ये मुख्याधिकारी गणेश पांडेंच्या मार्फत आचारसंहिता काळात काढण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आले आहे.काँग्रेसचे उमेदवार व काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील,नगर विभागाचे सहाय्यक आयुक्त पेंटे व बुलढाणा नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी जयश्री काटकर यांना निवेदन देवून प्रकरणाची चौकशी करून बॅक डेट मध्ये कंत्राटदारांना दिले जाणारे देयके देऊ नये व विकास कामांची एम बी ताब्यात घ्याव्यात व विकास कामांचे बँक इस्टेटमेंट तपासावे अशी मांगणी केली आहे.आत्ता या तक्रारीवर मुख्यधिकारी गणेश पांडे आपली काय बाजू मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे कि, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची तात्पुरत्या स्वरुपात बदल्या करण्यात आल्या आहे. यामध्ये बुलडाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांचीदेखील शेगाव येथे बदली करण्यात आली आहे.
त्याच्या जागी बुलडाणा नगर परिषद येथे शेगाव येथील मुख्याधिकारी जयश्री काटकर ह्या रुजू झाल्या आहेत. त्यांच्या प्रभारी कार्यकाळात २ डिसेंबर २०२५ रोजी निवडणुकीचे मतदान झाले आहे. २१ डिसेंबर २०२५ रोजी मतदानाचे निकाल जाहीर होणार आहे आणि बुलडाणा नगर परिषदेवर नगराध्यक्ष व नगरसेवकांची नवीन समिती गठीत होणार आहे. करिता आम्हाला आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या अगोदरचे बुलडाणा शहरात झालेल्या विकास कामांचे कंत्राटदारांचे देयके शेगाव नगरपरिषद येथे प्रभारी पदावर असलेले मुख्याधिकारी गणेश पांडे हे मागील दिनांकमध्ये (Back Date मध्ये) काढत आहे. आम्ही जेव्हा बुलडाणा नगर परिषदेच्या रोखपाल (Account) विभागात गेलो तेव्हा तेथे अनेक कंत्राटदारांचा जमाव निदर्शनास आले, म्हणून आम्हाला मिळालेली माहिती हि खरी असल्याचे आमचे मत झाले आहे. करिता बुलडाणा शहरातील ज्या विकासकामांचे देयके काढ्यात आले नाही त्यांचे MB आप्क्या ताब्यात घ्याव्या शिवाय झालेल्या विकास कामांचे बँकस्टेटमेंट आपल्याकडे चौकशीसाठी बोलावण्यात यावे व सध्याच्या दिनांकात कंत्राटदारांकडून बुलडाणा नगर परिषदेच्या खाते असलेल्या बँकेत देयके न वटवण्याच्या सूचना आपल्याकडून बँकेला देण्यात याव्या. करिता आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही म्हणून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी करावी व कोणतेही कंत्राटदारांचे बिले काढू नये अशी सूचना बुलडाणा नगरपरिषदेला द्यावी अशी विनंती केली आहे.निवेदनावर जाकीर कुरेशी (माजी नगरसेवक कॉंग्रेस), संदीप बोरडे, सुरेश पाटील, शेख लाल उर्फ बबलू कुरेशी, चंद्रकांत चव्हाण, विनोद गवई, श्रीकृष्ण पाटील, तारिक नदीम, विजय मोरे, केशव ठाकरे, गणेश माने, शेख अमीन, राहुल काळे, वसिम शेख पत्रकार, नदीम शेख पत्रकार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत..




