डोळ्याच्या हॉस्पिटलचा ‘हाय डोज’ घात.. हसत-खेळत आला अन,जिवाने गेला..बेशुद्धीच्या “हाय डोज” इंजेक्शने 11 वर्षीय निरागस बालकाचा बळी?.. “तेरी भी चुप… मेरी भी चुप” ने मृत्यू दडपण्याचा झाला खेळ.. बुलढाण्याच्या डॉक्टर फिल्ड मध्ये खळबळ..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: देवाचा दुसरा अवतार म्हणवले जाणारे डॉक्टरच ‘भक्षक’ बनल्याची धक्कादायक घटना बुलडाणा शहरात घडली आहे.बुलढाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये डोळ्याचे ऑपरेशनसाठी आलेल्या केवळ ११ वर्षीय निरागस बालकाचा जीव, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी 7 डिसेंबर रोजीची आहे.हा बालक हॉस्पिटलमध्ये हसत-खेळत आला अन बेडवर जिवाने गेला.सदर बालक घाटाखालील एका परिचित गावातील आहे, विशेष म्हणजे भक्षक डॉक्टरने “तेरी भी चुप… मेरी भी चुप” ने सगळे प्रकरण दाबले आहे.

बुलढाणा विधानसभा मधील घाटाखालच्या गावातील 11 वर्षीय बालकाला त्याच्या नातेवाईकांनी बुलढाण्याच्या हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या ऑपरेशन करण्यासाठी आणले होते,बालकाला ऑपरेशन संदर्भात माहीत पडल्याने त्याने ऑपरेशन करण्यासाठी नकार दिला,मात्र त्या निरागस बालकाला ऑपरेशन बेड वर टाकून “आडवे”, डॉक्टरने ऑपरेशन करण्यासाठी या बालकाला बेशुद्ध करण्याची योजना आखून त्याला भुलबतज्ञ म्हणजे बेशुद्धीचा इंजेक्शने टोचले,मात्र हाय डोज झाल्याने हा बालक अस्तव्यस्त झाला व त्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झाल्याची खात्रीलायक माहिती डॉक्टरी फिल्ड मधील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.प्रकरण अंगलट येत पाहून या भक्षक डॉक्टरने बुलढाण्यातील राजकीय भाषा करणारे मोठे हॉस्पिटलला रेफर केले व त्या राजकीय भाषा करणाऱ्या डॉक्टरने मृत्यू झालेल्या बालकाला भरती करून घेतले.यावेळी मृत्यू झालेल्या निरागस बालकाचे नातेवाईकांनी आपला टाहो फोडला होता,मात्र काही राजकीय नेते व राजकीय भाषा करणारे डॉक्टरने प्रकरण मॅनेज करून भक्षक डॉक्टरने “तेरी भी चुप…मेरी भी चुप” ने सगळे प्रकरण दाबले असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.या धक्कादायक मृत्यूची व जबाबदार डॉक्टरांची सखोल,निष्पक्ष चौकशी व्हावी, व या प्रकरणात सामाजिक संघटनांनी उतरून अशा प्रकारे हलगर्जीपणा करून 11वर्षीय निरागस बालकाच्या मृत्यूला जबाबदार असलेला भक्षक डॉक्टरला व त्याला मदत करणाऱ्या राजकीय भाषा करणाऱ्या डॉक्टरला त्याची जागा दाखविणे आवश्यक आहे.जेणे करून अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये एवढे मात्र खरे…!

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!