कारवाई पासून वाचलेले बुलढाण्यातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी: बोगस जात व्हॅलेंडीटी प्रकरणात मनोज मेरत यांनी कमवले 25 कोटी रुपये..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणाः “विजा अ” प्रवर्गात बोगस जात प्रमाणपत्राची व्हॅलेंडीटी निर्गमित केल्याप्रकरणी बुलढाण्याचे समाज कल्याण विभागातील तत्कालीन संशोधन अधिकारी अनिता राठोड आणि वृषाली शिंदे यांच्या निलंबनाची घोषणा काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी तारांकित प्रश्न सभागृहात मांडल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी काल गुरुवारी केली होती. याच पार्श्वभूमीवर, आता “विजा अ” प्रवर्गात बोगस जात प्रमाणपत्र व्हॅलेंडीटी प्रकरणी बुलढाण्यातील दोन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप करण्यात आले आहे.
आरक्षण बचाव समितीचे राजेश राठोड यांनी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेऊन बुलढाणा जात प्रमाणपत्र व्हॅलेंडीटी विभागाचे मनोज मेरत यांनी लाखो रुपयांचा अपहार करत बोगस प्रमाणपत्राची व्हॅलेंडीटी निर्गमित केल्याचा आरोप करून मेरत यांनी 25 कोटी रुपयांची माया जमवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तर यात प्रकरणात जिल्हा परिषदेचे सीईओ गुलाबराव खरात यांच्यावरही आरोप करण्यात आले आहे. याशिवाय, या प्रकरणाशी संबंधित राज्यातील विविध ठिकाणांचा संदर्भ देत आरक्षण बचाव समितीचे राजेश राठोड यांनी भूमिका स्पष्ट केली. दोषींवर तातडीने कारवाई व्हावी, अन्यथा आरक्षण बचाव समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. राठोड यांनी केलेल्या आरोपांवर बुलढाण्यातील समाज कल्याण विभागात कार्यरत असलेल्या संशोधन अधिकारी मनोज मेरत यांनी स्पष्टीकरण देत सांगितले आहे की,व्हॅलेंडीटी देण्यासंदर्भात त्रि सदस्य समिती असते,आणि सगळी प्रकिया ऑनलाईन आहे.शिवाय रक्त नात्यातील व्हॅलेंडीटी मागणाऱ्या करिता शासनाचा निर्णय आहे..असे सांगत त्यांनी आरोपांची खंडन केले.शिवाय मी आरोपानुसार 25 कोटी कमावलं तर हे पैसे कुठे आहे ते पैसे शोधून देण्याचे आवाहन देखील मनोज मेरत यांनी आरोप करणारे आरक्षण बचाव समितीचे राजेश राठोड यांना केले आहे..




