भरवस्तीतील देशी दारूची दुकान इतरत्र हलवा,भाजप युवा मोर्च्याची मागणी..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा शहरातील अण्णाभाऊ साठे नगर व रामदेवजी नगर मध्ये भरवस्तीतीत असलेली देशी दारूची दुकान इतरत्र हलवा अशी मांगणी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष करण अर्जुन बेंडवाल यांनी केली आहे.
बेंडवाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुलडाणा शहरात आज राजरोजपणे देशीदारुचे दुकान हे शहर पोलीस स्टेशनला लागुनच तसेच नागरीवस्तीचे मधोमध नियमितपणे सुरु आहे. सदरहु देशीदारुचे दुकान हे जि.बी. वारे यांचे नावाने आहे ते वार्ड क्र १ बुलडाणा येथे सुरु आहे.हे दारुचे दुकान हे नागरी वस्तीत असल्याने सदरहु दुकानासमोरुन शालेय विद्यार्थी/विद्यार्थीनी शाळा कॉलेजला जातात तसेच आमच्या महिला भगीनी हया आठवडी बाजारात नियमित जात असतात. मात्र जि.बी. वारे यांचे देशी दारु दुकान शहर पोलीस स्टेशनचे भिंतीलाच लागुन असल्याने तसेच या दुकानाबाबत अनेकवेळा निवेदन, तक्रारी देऊनही सदरहु देशीदारुचे दुकान इतरत्र स्थलांतरीत करणेबाबत कोणतीही कार्यवाही आज पर्यत करण्यात आलेली नाही.म्हणून ही देशी दारूची दुकान इतरत्र हलवावे..




