“तोतया सीए विष्णू मुळेंच्या” बोगसगिरीचा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनस्ताप…
600 ते 700 पोलीस कर्मचाऱ्यांना तर 30 ते 35 सामान्य रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्स विभागाची नोटीस, प्रशासनात खळबळ

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: लोकप्रिय मराठीच्या संपादक वसीम शेख अनवर यांनी जवळपास 400 कोटींच्या इन्कम टॅक्स विभागाला चुना लावून घोटाळा केल्याचा उघडकीस आणला होता.घोटाळ्यातील कोट्यवधी रुपयांची हडप केलेली रक्कम आत्ता दंडासह इन्कम टॅक्स विभागाने वसुली करण्यास सुरवात केली आहे. 600 ते 700 पोलीस कर्मचाऱ्यांना तर 30 ते 35 जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्स विभागाची जवळपास 100 कोटींच्या रुपयांच्या वर नोटीसा पाठविण्यात आल्या आहे,ज्यांना-ज्यांना नोटीसा पाठविण्यात आले आहे.त्यांना-त्यांना इन्कम टॅक्सला विभागाला चुना लावलेल्या रक्कमेसह दंडाची रक्कम भरण्याचे आदेशीत करण्यात आले आहे.यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.हा मनस्ताप शासकीय कर्मचाऱ्यांना बुलढाणा शहरातील जांभरूळ परिसरात राहणाऱ्या “तोतया सीए विष्णू मुळेंच्या” बोगसगिरीमुळे सोसावा लागत आहे..
जांभरुळ रोड परिसरात राहणारा तोतया सीएचा विष्णू मुळे याने शासकीय कर्मचाऱ्यांचे फॉर्म नंबर 16 चे इन्कम टॅक्स रिटर्न भरतांना इन्कम टॅक्स चुकविण्यासाठी त्यात बोगस क्लेम दाखल केले, क्लेम भरल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून भरलेल्या क्लेम मधून 30 टक्के कमिशन घेत होता.तोतया सीए विष्णू मुळे यांनी दोन हजार (2000) च्या वर फॉर्म 16 भरून व बोगस क्लेम करून 400 कोटी रुपयां पेक्षा जास्त रुपयांचा चुना इन्कम टॅक्स विभागाला लावला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. दरम्यान नागपूर येथील इन्कम टॅक्स विभागातील अधिकाऱ्यांच्या एका पथकाने 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तोतया सीए विष्णू मुळे च्या घरी छापा मारून कॉम्प्युटरमधील 200 पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याचा डेटा हस्तगत केले आहे.याबाबची पोल-खोल लोकप्रिय मराठीचे संपादक वसीम शेख अनवर यांनी समोर आणल्यानंतर यांची गंभीर दखल इन्कम टॅक्स विभागाने घेतली असून बोगस पद्धतीने भरलेल्या बोगस क्लेमची रक्कमेसह दंडाची रक्कम भरण्याचे आदेशीत करण्यात आले आहे.
600 ते 700 पोलीस कर्मचाऱ्यांची सण 2020-2021,2021-2022,2022-2023,2023-2024 आणि 2024-2025 इन्कम रिटर्न मध्ये भरलेले बोगस क्लेम बाबत इन्कम टॅक्स विभागाचे पत्र पोलीस विभागाला मिळले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी संबंधित पोलीस खात्यातील सर्व विभागाला बिनतारी संदेश नुसार इन्कम टॅक्स विभागाकडून आलेल्या पत्रांमधील 1633 कर्मचाऱ्यांच्या नावे संदर्भात 10 नोव्हेंबर रोजीपर्यंत नोटिसमध्ये आलेल्या रकमेचा भरणा करण्याच्या सूचना केल्या आहे.
-“तोतया सिए” वर पोलीस विभागाने कारवाई करने अपेक्षित-
ज्या पोलीस विभागाला चांगले-चांगले,मोठे-मोठे गुंडे घाबरतात, अशा पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर कामे करण्यासाठी भाग पाडणाऱ्या महाशयांचे नांव आहे,”विष्णू मुळें”… या विष्णू मुळेंनी स्वतःला सीए दाखवत आपल्या घरावर सीए असल्याची पाटी(फलक) लावून पोलिसच नव्हे तर अन्य शासकीय कर्मचाऱ्यांचे देखील या महाशयांनी फॉर्म 16 चे इन्कम टॅक्स रिटर्न भरले,याने लाखों रुपयांचे इन्कम टॅक्स माफ करण्यासाठी शक्कल लढवत इन्कम टॅक्स रिटर्न भरतांना कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत बोगस क्लेम दाखल केले.जेवढे रकमेचे क्लेम भरले आहे.तेवढे रकमेचे 30 टक्के कमिशन देखील घेतल्याचे नोटीस आलेल्या कर्मचारी चर्चा करीत आहे.अशी दिशाभूल केल्यानंतरही या तोतया सीए विष्णू मुळेंवर पोलिसांकडून अद्यापर्यंत कारवाई करण्यात आली नाही.उलट असे म्हटले जाते की,कर्मचाऱ्यांच्या आधार ‘ओटीपी’ भरल्याने बोगस क्लेम भरणाऱ्या कर्मचारी दोषी आहे.मात्र जवळपास 2 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे फॉर्म नं.16 चे इन्कम टॅक्स रिटर्न भरतांना जवळपास 400 कोटीं रुपयांचे बोगस क्लेम तोतया सीए विष्णू मुळे याने आपल्या जांभरुळ रोड परिसरात असलेल्या घरातून ऑनलाईन पद्धतीने भरले.ज्या ठिकाणाहून विष्णू मुळे याने कर्मचाऱ्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन भरल्याने विष्णू मुळें यांचे आयपी (IP) ऍड्रेस द्वारे हे भरल्या गेल्याने, इन्कम टॅक्स विभागाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यासाठी पोलीस व अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून बोगस क्लेम करून 30 टक्के कमिशन प्रमाणे 90 ते 100 कोटी रुपयांची कमाई केल्याचे चर्चेतून समोर येत आहे.म्हणून पोलीस विभागाने पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तोतया सीए विष्णू मुळे वर कारवाई करणे अपेक्षित आहे.




