अवैध गर्भ लिंग तपासणी केंद्रावर बुलढाणा जिहा सामान्य रुग्णालय पथकाचा छापा, गवई नामक डॉक्टरला घेतले ताब्यात..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे.बुलढाणा शहरातील सुंदरखेड मधील तार कॉलनी परिसरातील डॉ.कैलास गवई याच्या घरावर बुलढाणा जिहा सामान्य रुग्णालय पथकाचा छापा टाकण्यात आला असून डॉ.कैलास गवई यांना ताब्यात घेण्यात आले आहे.गर्भ मधील अवैध पद्धतीने गर्भ लिंग निदान करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.पथकाने आज सकाळी पासून डॉ.गवई यांच्या घराची झडती घेण्याची कारवाई सुरू होती.मिळालेल्या माहिती नुसार सामान्य रुग्णालयाच्या पथकाने एका महिलेच्या माध्यमातून हा सापळा रचला..पुढील कारवाई सुरू आहे..जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पथकामध्ये बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील कामगिरी बाजवली..




