बुलढाणा शहरातील शेकडो युवकांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश…
काँग्रेसच्या सत्तेत भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन व नगरसेवकांचे ठेकेदारी मुळासह नष्ठ करणार-दत्ता काकस

लोकप्रिय मराठी नेटवर्क
बुलढाणा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने काल नगर परिषद व नगरपंचयातच्या निवडणूकांची घोषणा केली आहे.यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहे.याच अनुषंगाने बुलढाणा शहरातील शेकडो युवकांनी आज बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी प्रवेश केला आहे.
शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष दत्ता काकस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कॉंग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक राजेंद्र राख यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच बुलढाणा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहूल बोंद्रे, जेष्ठ नेते लक्ष्मण भुमरे, देवानंद पवार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात या शेकडो युवकांनी प्रवेश केला आहे. यावेळी बुलढाणा शहराला भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त शहर करण्यासाठी शेकडो युवकांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. बुलढाण्याचे नागरिक देखिल महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत सोबत खंबरीपणे उभे राहतील अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यांनी दिली. या पक्ष प्रवेशावेळी कांग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




