मंत्री शिरसाट साहेब न्याय द्या, माझी जमीन हडपणाऱ्या आपले OSD सिद्धार्थ भंडारे यांना पदमुक्त करा…राहुल तारे यांची बुलढाण्यात येणाऱ्या मंत्री संजय शिरसाटांना विनंती..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: अनेकांन अनेक प्रकरणात चर्चेत आलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुन्हा बुलढण्यातुन चर्चेत आलेय, यावेळी ते त्यांचे OSD सिद्धार्थ भंडारे यांच्यामुळे चर्चेत आलेय.बुलढाण्यातील तारे कुटूंबांनी त्याचे OSD सिद्धार्थ भंडारे यांच्यावर त्याच्या ताब्यातील साडे चार कोटीची 14 एकर शेती गैर मार्गाने हडपण्याचे आरोप केले आहे. त्यांनी हे आरोप आज रविवारी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे बुलढाण्यात येणार असल्याने हा विषय उजेडात आला आहे..
बुलढाणा येथील रहवासी राहुल तारे याची वडिलोपार्जित सामायिक 28 एकर शेती डोंगर खंडाळा येथे आहे.या जमिनीमध्ये या शेतीच्या सामायिक सातबारा मध्ये जवळपास 23,24 वारसदार आहेत. सदर जमिनीची कुठल्याच प्रकारची वाटणीपत्र किंवा वारसदारानुसार सीमांकन झालेले नाहीत. या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान राहुल तारे यांच्या वडिलोपार्जित सामायिक 28 एकर शेतीमधील आठ वारसदारांनी 14 एकर शेती हे छत्रपती संभाजी नगर येथील महेंद्र राऊत यांना साडे चार कोटीमध्ये विकलीये, विशेष म्हणजे महेंद्र राऊत हे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांचे मावस भाऊ आहे.दरम्यान खरेदी विक्री करत असताना उर्वरित वारसदारांचे कोणतेही प्रकारची संमती घेण्यात आली नाही आणि सा.दुय्यम निबंधक सागर पवार यांनी परस्पर ही खरेदी करून दिल्याचे आरोप राहुल तारे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना दिली आहे. शिवाय बुलढाण्याचे तत्कालीन मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी देखील आम्ही घेतलेल्या हरकतीवर कोणताही विचार न करता महेंद्र राऊत यांच्या नावाने 14 एकर शेतीची नोंद घेतली आहे. आमच्या जमिनी हडपण्याचा हा सर्व प्रकार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे OSD सिद्धार्थ भंडारे यांच्या इशाऱ्यावरून झाल्याचे आरोप देखील राहुल तारे यांनी उपस्थित केले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून चौकशीमध्ये सहाय्यक दुय्यम निबंधक सागर पवार आणि तत्कालीन मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांचे फोन कॉल डिटेल्स काढावे या फोन कॉल्स मध्ये 100% सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे OSD सिद्धार्थ भंडारे यांचा सहभाग आढळून येणार आहे असे म्हणत आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे बुलढाण्याला येत आहे.त्यांनी माझ्या मागणीची दखल घेत सुरुवातीला सिद्धार्थ भंडारे यांची त्यांच्या OSD पदावरून पदमुक्त करा व प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून मला न्याय द्यावा, कारण मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाचा कारभार आहे आणि ते न्याय देणारे आहेत म्हणून त्यांनी मला न्याय द्यावाच अशी भावनिक विनंती राहुल तारे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांना केली आहे..




