मनाई हुकूम असतानाही शेगाव हद्दीत सुरू होता जुगार अड्डा: अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या पथकाने 60 जुगारांवर कारवाई..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
शेगाव: शेगांव शहरातील खामगाव-शेगांव रोडवरील आदर्श रिसॉर्ट येथे आज शुक्रवारी मध्यरात्री खांमगाव अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी पथकाने 60 जुगारांवर कारवाई केली आहे.या जुगारींकडून नंगदी 17 लाख 52 हजार 320/- रुपयासह 12 चारचाकी वाहन, 05 मोटार सायकल, 52 मोबाईल असा एकुण 62 लाख 02 हजार 640/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
काल गुरुवारी मध्यरात्री आदर्श रिसोर्ट, खामगांव रोड, शेगांव येथे काही लोक जुगार खेळत असल्याची माहीती खांमगाव अपर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर ल यांना मिळालेल्या माहीतीवरुन त्यांच्या पथकाने छापा टाकला असता
60 जण जुगार खेळतांना आढळुन आले. हा जुगार क्लब अनेक दिवसापासून सुरू असल्याची आता चर्चा रंगतेय..




