लोकप्रिय मराठीचा इम्पक्ट… बातमी येताच रातोरात काढले रस्त्याच्या मधोमधचे फाउंडेशन…

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाणा शहरातील सोसायटी पेट्रोल पंपाजवळील सर्क्युलर रोड बायपास रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट लाईट नसलेल्या फाउंडेशनला कार धडकल्याने काल बुधवारी 22 ऑक्टोबरच्या रात्री 7:30 वाजेच्या सुमारास अपघात झाल्याची घटनेची बातमी लोकप्रिय मराठीने काल बुधवारी 22 ऑक्टोबर रोजी प्रकाशित केली होती.लोकप्रिय मराठीच्या बातमीची दखल घेत बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार रवी राठोड यांनी पुढाकार घेत बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी आपले कर्मचारी पाठवत व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट लाईट नसलेल्या फाउंडेशनला फोडून मुळासह तोडून टाकण्यात आले आहे.जनतेच्या हिताच्या व जनतेच्या जीवनाशी निगडित असलेल्या प्रकार लोकप्रिय मराठी नेहमी समोर आणत राहील व त्याचा पाठपुरावा देखील लोकप्रिय मराठी करत राहील..

सोसायटी पेट्रोल पंपाजवळील सर्क्युलर रोड बायपास रस्त्याच्या मधोमध मोठा स्ट्रीट लावण्यात आला होता.दरम्यान दसेऱ्या पासून या रस्त्याच्या मधोमध असलेला स्ट्रीट काढण्यात आला होता.व त्याचे फाउंडेशन जसेचे तसे ठेवण्यात आले होते.या फाउंडेशनला कोणतेही दिशा दर्शक देखील लावण्यात आले नव्हते.शिवाय या परिसरात अंधार असल्याने नवीन वाहनधारकांना हे फाउंडेशन दिसत नसल्याने भरधाव वाहनाला याची धडक बसत होती.काल बुधवारी 22 ऑक्टोबर रोजीच्या रात्री या फाउंडेशनला कार धडकली होती व कारचा मोठा नुकसान देखील झाला होता.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!