संदीपदादा शेळकेंची सहकुटुंब कुंवरदेव येथे दिवाळी; महिलांना साडीचोळी, फराळ वाटप…

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
जळगाव जामोद : दरवर्षीप्रमाणे शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी १८ ऑक्टोबर रोजी सहकुटुंब तालुक्यातील कुंवरदेव येथील आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. माता भगिनींना साडी, चोळी देऊन फराळ वाटप केला. वंचितांसोबतच्या दिवाळीचे यंदाचे हे सातवे वर्षे आहे.
राजर्षी शाहू परिवाराने कुंवरदेव हे आदिवासीबहुल गाव दत्तक घेतले आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करुन आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे ध्येय आहे. यानुषंगाने गावात विविध उपक्रम राबविण्यात येतात. संदीपदादा शेळके यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आदिवासी बांधवांसोबत सहकुटुंब दिवाळी साजरी केली जाते. त्यांच्या आनंदात सहभागी होऊन सणाचा गोडवा वाढवला जातो. राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या हस्ते धनत्रयोदशीला गावातील माता-भगिनींना साडी-चोळी, ड्रेस आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या भेटवस्तूंनी त्यांच्या चेहऱ्यावर निरागस आनंद फुलला.
याप्रसंगी संस्थेच्या संचालिका छायाताई शेळके, वसंता इंगळे, शैलेश काकडे, शरद मोहिते, संजय लोखंडे, दीपक मानकर, सुभाष मानकर, शिरीष मारोडे, सागर मारोडे, मनोज वाघ, गणेश जाधव, विश्वनाथ गावंडे, शांताराम मुऱ्हेकर, प्रमोद तायडे, सचिन फाळके, श्याम उन्हाळे, अतुल उन्हाळे, योगेश उन्हाळे उपस्थित होते.
जगाच्या झगमगाटापासून कोसोदूर असलेल्या बांधवांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केल्याने सणाचा गोडवा वाढला. कुंवरदेव गावच्या मातीशी असलेले भावनिक नाते अधिक घट्ट झाले.अशी भावना राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी व्यक्त केली.




