काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी भागात साजरी केली “दिवाळी”

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी दिवाळी म्हणजे केवळ सण नव्हे, तर माणसांमधील नाळ अधिक घट्ट करणारा उत्सव आहे. मागील २७ वर्षांपासून सातपुडा पर्वतरांगांतील भिंगारा, चालीस टपरी, गोमाल या गावांतील गावकऱ्यांसोबत ते दर दिवाळीला ३ दिवस मुक्काम करतात. या मुक्कामाच्या वेळी ते स्थानिकांसोबत विशेषतः मनोभावे दिवाळी साजरी करतात. या दिवाळीला देखील त्यांनी ही परंपरा राखली आहे.
सातपुडा पर्वतरांग ही मध्य भारतातील एक विस्तृत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशी पर्वतरांग आहे. या पर्वतरांगांमध्ये अनेक आदिवासी जमातींचे पारंपरिकरीत्या वास्तव्य आहे. या समाजांचे निसर्गाशी अतूट नाते आहे. ते पर्वत, वने, झरे, शेती व निसर्गाला जीवंत देवता मानून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करतात.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जपलेल्या या परंपरेतून महाराष्ट्र काँग्रेसच्या संवेदनशील नेतृत्वाची खरी ओळख दिसून येते. काँग्रेस पक्ष कायमच आदिवासी, वंचित व तळागाळातल्या समूहांना आपले मानून त्यांच्या विकासासाठी लढत आला आहे आणि यापुढेही लढत राहील, त्यांच्यासाठी कार्य करत राहील.अशी भावना कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.




