बुलढाणा शहर कार्याध्यक्ष आकाश दळवींची शिवसेनेला सोडचिठ्ठी,मुबंईत खा.श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवला राजीनामा..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता नव-नवीन ब्रेकिंग बातमी वाचायला मिळतील; अशीच एक नवीन ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा शहराध्यक्ष आकाश दळवी यांनी आपल्या पदाचा व शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी थेट मुंबई गाठून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवला आहे.नगरसेवक असतांना आकाश दळवी यांनी आ.संजय गायकवाड यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.विशेष म्हणजे आकाश दळवी यांनी 17 जुलै 2023 रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता..तर 17 ऑक्टोबर 2025 रोजीच त्यांनी शिवसेनेला सोड चिट्ठी केली आहे.
मुंबई येथे आयोजित शिवसेना विभाग निहाय पदाधिकारी आढाव बैठक मध्ये उपस्थित खासदार श्रीकांत शिंदे, केंद्रीयमंत्री प्रताप रावजी जाधव, मंत्री रामदास कदम, सुहास कांदे ह्यांच्या उपस्थितीत आकाश दळवी यांनी खासदार श्रीकांत यांच्याकडे आपल्या पदाचा व पक्षाचा राजीनामा सोपवला. यावेळी उपस्थित सगळ्यांनी 15 ते 20 मिनिट दळवींशी चर्चा करून त्यांची मनधरणी केल्याचा प्रयत्न केला आहे.मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असून मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचे दळवींचे म्हणणे आहे. राजीनाम्याचा वैयक्तिक कारण आकाश दळवी समोर करीत आहे.मात्र त्यांना बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवायची आहे.आणि त्यांना शिवसेनेत उमेदवारी मागितली तरी ते मिळणार नाही.याच कारणाने त्यांनी मुंबई गाठून थेठ शिवसेनेचे खा.श्रीकांत शिंदे यांनाच आपला राजीनामा सोपविला..




