शरद पवार राष्ट्रवादींच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर यांचा अचानक राजीनामा…

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाण्याच्या चिखली मतदारसंघाच्या माजी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर शरद पवार गटासोबतच राहण्याचा निर्णय रेखाताई खेडेकर यांनी घेतला होता.त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी अचानक राजीनामा दिला आहे.आत्ता काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक येऊन ठेपल्या आहे.निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी घेतलेला हा निर्णय कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारा आहे.म्हणून राजीनाम्या बाबत चर्चा रंगतेय,परंतु खेडेकरांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पत्राव्दारे कळविले आहे…




