बुलढाण्यात यशस्वी पारपडली विभागीय स्तरीय दंतपरिषद..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: इंडियन डेंटल असोभिएशन, बुलडाणा शाखेद्वारे बुलडाण्यात प्रथमच विभागीय स्तरीय दंतपरिषद 5 ऑक्टोबर रोजी यशस्वीरित्या पार पाड पडली.
या दंतपरिषदेचे अध्यक्षपद डॉ विप्लव चव्हाण व उपाध्यक्षपद डॉ आशिष खासबागे व डॉ. शरद जुमडे यांनी भूषविले.महाराष्ट्र स्टेट डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ राजेश गोंधळेकर व उपाध्यक्ष डॉ आशिष महाजन हेयांनी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विशेष उपस्थित होते.
या दंतपरिषदेमध्ये दंत वैद्य शास्त्रामधील राज्यस्तरिय वक्ते यांनी नवीन, आधुनिक दंतोपचार पद्धती विषयी मार्गदर्शन केले. या दंत परिषदेचा फक्त बुलढाणाच नाही तर अकोला, अमरावती, वाशिम, मेहकर,जळगाव आदि इतर जिल्हातील जवळपास 200 दंतचिकित्सकांनी लाभ घेतला. उत्कृष्ट नियोजन, सुंदर असे ठिकाण, सादरीकरण यामुळे या दंतपरिषदेचे पूर्ण महाराष्ट्र भर कौतुक होत आहे ही गोष्ट बुलढाणे करांसाठी नक्की गौरवास्पद आहे.इंडियन डेंटल असोसिएशन, बुलढाणा शाखेच अध्यक्ष डॉ राजेश जतकर, सचिव डॉ. संजय गवळी व कोषाध्यक्ष डॉ. धनंजय भुसारी व बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नामवंत दंतचिकित्सक हा कार्यक्रम यशस्वी होव्यासाठी गेल्या एक महिन्यापासून परिश्रम घेत होते.




